गोपीचंद पडळकर हे चॉकलेट बॉय असून ते प्रसिद्धीसाठी शरद पवारांवर टीका करत असतात त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. अशा शब्दात रोहित पवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली होती. त्यावर पडळकरांनी रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार हे बिनडोक आहेत. त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बोटे घालण्याची सवय आहे. असा टोला त्यांनी रोहित यांना लगावला आहे. MPSC तरुणांच्या आंदोलनाचे शरद पवार यांना श्रेय घ्यायचे म्हणून ते बैठक घडवून आणत आहेत. प्रत्यक्षात त्यांचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोडवत आहेत. असे देखील त्यांनी अधोरेखित केले. चिंचवड पोटनिवडणुकीच्या भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ पडळकर पिंपरी- चिंचवडमधील राहटणीत आले होते. त्यावेळेस त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.

हेही वाचा- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाईला वेग, कसब्यात भरारी पथकाकडून साडेपाच लाखांची रोकड जप्त

गोपीचंद पडळकर म्हणाले की, पुणे आणि चिंचवड येथील भाजपाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. त्यांनी त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात काय स्टेटमेंट केलं ते तुम्ही पाहिलं आहे. मेंढराच्या डागनीने डागल तर ते सुधारणार नाहीत. खुरप्याने डागावे लागेल. मग कुठेतरी अक्कल येईल. पुढे ते म्हणाले की, आंदोलन करत असताना मी कुठलेही विषय हातात घेतले तर मी मुळाशी जातो. एसटी कर्मचाऱ्यांची शरद पवार यांची संघटना पिळवणूक करायची ते आता थांबलेले आहे.

हेही वाचा- कसबा, चिंचवड पोटनिवडणूक: प्रचारात गुंठेवारीचा प्रश्न ऐरणीवर, मतदानाआधी न्यायालयाच्या निकालाची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

MPSC च्या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC तरुणांची बाजू ठाम पणे घेतली आहे. ते तरुणांच्या बाजूने आहेत. परंतु, जाऊन शरद पवार हे आंदोलन करणाऱ्या तरुणांची भेट घेतात. शरद पवार यांना श्रेय घ्यायचे असल्याने त्यांची बैठक घडवून आणत आहेत. त्यांना लुडबुड करण्याची गरज नाही. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. त्यांना प्रश्नांची सोडवणूक करायची नाही. असे ही त्यांनी म्हटले आहे.