लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करता यावे यासाठी मतदानाच्या दिवशी कामगारांना सुट्टी देण्यात यावी, असा आदेश राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागातर्फे देण्यात आला आहे. विभागातर्फे काढण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये हे नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये १०, १७ आणि २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पुणे जिल्ह्य़ातील मतदान १७ एप्रिल रोजी होणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विविध दुकाने, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, अन्नगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शाॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स आदी आस्थापनांनी त्यांच्या कामगारांना सुट्टी द्यावी आणि या सुट्टीसाठी कामगारांच्या वेतनामधून कोणतीही कपात करू नये, असे शासन निर्णयामध्ये म्हटले आहे.
आचारसंहितेमुळे लोकशाही दिन नाही
लोकसभा निवडणूकांच्या आचारसंहितेमुळे ७ एप्रिल रोजी होणारा जिल्हा लोकशाही दिन आणि २१ एप्रिल रोजी साजरा होणारा तालुका लोकशाही दिन होणार नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धिस दिलेल्या निवेदनाद्वारे कळवली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Apr 2014 रोजी प्रकाशित
मतदानाच्या दिवशी कामगारांना सुट्टी देण्याचे शासनाचे आदेश
लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करता यावे यासाठी मतदानाच्या दिवशी कामगारांना सुट्टी देण्यात यावी, असा आदेश राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागातर्फे देण्यात आला आहे.
First published on: 06-04-2014 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt declares holiday on voting day