पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीत केलेला निवडणूक खर्च पुढील नऊ दिवसांत सादर न केल्यास निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाने मंगळवारी दिला. त्यामुळे सदस्य आणि सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या ४२९३ जणांची निवडणूक खर्चाच्या हिशोबाचे आकडे जुळवताना दमछाक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुणे : ‘महाराष्ट्र केसरी’साठी सर्वांना समान संधी, बघायला मिळतील चटकदार लढती

हेही वाचा – पुणे : स्वस्त धान्य दुकानांसाठी दुकानदारच मिळेनात, २१८ परवाने मंजूर

जिल्ह्यात नुकतीच २२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल २३ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत सदस्यपदासह थेट सरपंच पदाच्या २०७४ जागांसाठी ३५३२ उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. तसेच, ७६१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण ४२९३ उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब २० जानेवारीपर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी किंवा तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब अद्याप सादर केला नाही, त्यांनी तातडीने सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gram panchayat elections expenses should be submitted within next nine days order collector office pune to sarpanch pune print news psg 17 ssb
First published on: 11-01-2023 at 17:26 IST