पुणे : हैदराबाद येथून मुंबईकडे होत असलेली गुटख्याची वाहतूक रोखण्यात अन्न आणि औषध प्रशासनाला यश आले. हडपसर पोलिसांच्या मदतीने प्रशासनाने ५२ लाख १८ हजार रुपये किमतीचा गुटखा आणि दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा ६२ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीराम यादव (वय ५२) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. त्याचे साथीदार सिदलेडत्त रेड्डी, विष्णु रेड्डी, सुशांत रे, दीपक कोठारी यांच्यावरही या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिल सदाशिवराव गवते (वय ५३) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.  गुटख्याने भरलेला कंटनेर हैदराबाद येथून बुधवारी (२९ जुलै) दुपारी मुंबईकडे निघाला असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. याबाबत हडपसर पोलिसांच्या मदतीने कंटेनरला हडपसर येथे थांबविण्यात आले. तपासणी केली असता ट्रकमध्ये ४० पोत्यांमध्ये आढळून आलेला ५२ लाख १८ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला, असे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वास डगळे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hadapsar police seized gutka worth rs 52 lakh 18 thousand and truck zws
First published on: 30-06-2022 at 17:13 IST