लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पतीसह सात जणांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BJP manifesto does not mention job creation statehood for Kashmir
महागाई, एनआरसीबाबत भाजपचे मौन; रोजगारनिर्मिती, काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचा जाहीरनाम्यात उल्लेख नाही
jalgaon voter awareness marathi news, jalgaon voter id marathi news
तुमचे गाव, सोसायटीला सुवर्ण, रौप्य, कांस्य यांपैकी कोणता फलक हवा ? मतदान टक्केवारी वाढीसाठी प्रशासनाचा अनोखा उपक्रम
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

या प्रकरणी २० वर्षीय विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती विशाल कडू इंगळे, सासरे कडू शवराव इंगळे, नंदावा भाऊसाहेब देवरा गायकवाड आणि चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-वानवडीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; गुन्हे शाखेचा छापा; पाच तरुणी ताब्यात

आरोपी विशाल याला त्याच्या गावी ग्रामपंचायत निवडणूक लढवायची होती. निवडणूक लढविण्यासाठी पैसे लागणार असल्याने विशाल आणि त्याच्या कुटुंबीयांनी फिर्यादी विवाहितेकडे माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच विवाहितेला मारहाण करून शारीरिक आणि मानसिक छळ केला. निगडी ठाण्याचे फौजदार कुमार गिरीगोसावी तपास करीत आहेत.