पुणे : दिल्लीतील जोरदार पावसाचा परिणाम हवाई वाहतुकीवर होत असून, बुधवारी पुण्याकडे येणाऱ्या एका खासगी कंपनीच्या विमानाला तीन तास उशीर झाला. पुण्यावरून चेन्नईकडे जाणाऱ्या ‘एअर इंडिया’च्या विमानालाही दीड तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली असून दीर्घ काळ प्रतिक्षेत बसावे लागले असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार दिल्ली आणि आसपासच्या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. उड्डाणांच्या वेळापत्रकासाठी दृश्यता आणि धावपट्टीवरील स्थिती महत्त्वाची आहे. पावसामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होत आहे. त्यामुळे विलंबाने विमानांचे उड्डाणे होत आहेत. त्यामुळे केवळ दिल्ली–पुणे नव्हे तर इतरही अनेक मार्गांवरील विमानसेवांवर परिणाम दिसत आहे.