पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीकरिता आज भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत रासने यांनी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची यांची केसरीवाडा येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

हेमंत रासने यांनी मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तर यावेळी शैलेश टिळक यांनी हेमंत रासने यांना आगामी निवडणुकीकरिता शुभेच्छादेखील दिल्या.

हेही वाचा – पुणे : जंगली महाराज रस्त्यावर फुगे विकणारी तीन मुले बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा

हेही वाचा – चिंचवड पोटनिवडणूक : “मला दिर शंकर जगताप मुलासारखे, आमच्या कुटुंबात वाद नाही”, अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाच गड राखणार – हेमंत रासने

”आजवर प्रत्येक निवडणूक भाजपाचे नेते खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. ही पोटनिवडणूकदेखील त्यांच्याच नेतृत्वाखाली होणार असून, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच गड राखणार,” अशी भूमिका कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी मांडली.