राज्य शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वागिण विकासासाठी बांधील आहे. त्यामुळे इतर घटकांप्रमाणे अपंगांसाठी राज्यात नवीन स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याचा शासनाचा विचार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हेही वाचा- शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमावर डाॅ. अमोल कोल्हे यांचा बहिष्कार

बालेवाडी क्रीडा संकुलात अपंग मुला-मुलीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभात पाटील बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपंग विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख, समर्थ व्यायाम मंडळाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, उपायुक्त संजय कदम, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी ,जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार आदी या वेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, की शासनाने अपंग कल्याण विभाग या स्वतंत्र विभागाची निर्मिती केली आहे. त्यामुळे अपंगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करून दिव्यांगाचा सर्वागिण विकास करण्यात येईल. अपंगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांतून अपंगही कुठे कमी नाहीत असा संदेश समाजासमोर आला आहे. त्यामुळे अपंग मुलामुलींचे मनोबल वाढेल.

हेही वाचा- पुणे : शिवनेरीवर महाशिवआरतीला ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांना पाठवा; विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना

अपंगांसाठीच्या राज्यस्तरीय स्पर्धांमुळे अपंगांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याबरोबरच नवीन अनुभूती त्यांना मिळाली आहे. ही अनुभूती त्यांच्या जीवनात कायम राहील. अशा स्पर्धातून राज्य पातळीवरचे खेळाडू तयार होऊन देशपातळीवर निश्चित राज्याचे आणि देशाचे नाव उजळवतील. भविष्यात दिव्यांगांसाठी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात येतील असे पवार यांनी नमूद केले.

हेही वाचा- “मी कोणाशी बोलायचे तो माझा अधिकार”, पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर जिल्हा अव्वल

गेले तीन दिवस झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर जिल्ह्याने अव्वल स्थान मिळवले. मूकबधिर, कर्णबधिर आणि बहुविकलांग या तीन प्रवर्गात विजेता संघ म्हणून नागपूर जिल्ह्याला तीन चषक प्रदान करण्यात आले. अंध प्रवर्गात अमरावती, अस्थिव्यंग प्रवर्गात उस्मानाबाद, मतिमंद प्रवर्गात मुंबई उपनगर जिल्ह्याने विजेतेपद मिळवले. अंध ,मूकबधिर, कर्णबधिर, अस्थिव्यंग या प्रवर्गात पुणे जिल्हा, बहुविकलांग प्रवर्गात लातूर जिल्हा उपविजेता ठरला.