पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रोच्या अनुषंगाने विविध कामे वेगाने सुरू आहेत. मंगळवारी (१२ जुलै) मेट्रो मार्गावरील एक हजार पाईलिंगचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. बालेवाडी क्रीडा संकुलाजवळ मेट्रोचे नियोजित स्थानक क्रमांक दहा येथे एक हजाराव्या पाईलिंगचे काम मंगळवारी पूर्ण करण्यात आले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम टाटा समूहाची विशेष वहन कंपनी असलेल्या पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि.कडून (पीआयसीटीएमआरएल) करण्यात येत आहे. या मार्गिकेवर आजपर्यंत तब्बल १२ हजार १४७ रनिंग मीटरचे बॅरीकेडींगचे काम पूर्ण झाले आहे. त्या जोडीला एकूण २२ खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. स्थानकासाठी बनवल्या जाणाऱ्या पाईल कॅप्ससह खांबांच्या पाईल कॅप्सची एकूण संख्या आता ८६ झाली आहे, अशी माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी दिली.

mumbai ramabai ambedkar nagar zopu marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार
Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार

‘पाईलिंग काम’ म्हणजे काय?

पाईलिंग काम ही बांधकाम प्रक्रिया पाया स्थापित करण्यासाठी वापरली जाते. मेट्रो स्थानक ज्या खांबांवर उभे केले जाणार आहे, ते खांब आणि त्याच्यासाठी खणलेल्या पाईलिंगला जोडणारा पाया म्हणजे पाईल कॅप असते. ही पाईलकॅप टाकण्यापूर्वी जमिनीमध्ये खांबावर एकूण किती दबाव असणार आहे, त्यानुसार एक सारख्या आकाराचे खड्डे केले जातात, ज्यांना ‘पाईल’ म्हटले जाते. साधारण १४ दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाते.