पुण्यातील काळे पडळ येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या ४९ वर्षीय सुजितकुमार बसवंतप्रसाद सिंग यांना भरधाव कारने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर या प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. समीर गणेश कड (रा. कडनगर, होलेवस्ती चौक, उंड्री) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी वाहनचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजितकुमार सिंग हे उंड्री परिसरात राहायला असून ते १ एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंक वॉकला गेले होते. त्यावेळी त्यांना एका भरधाव चारचाकी वाहनाने जोरात धडक दिली. या घटनेत सुजितकुमार सिंग यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली, तर घटनास्थळावरून वाहनचालक फरार झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना केली होती. तर घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामधील फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू होते. mh 12 xh 5434 क्रमांकाची चारचाकी सीसीटीव्ही फुटेजमध्ये जाताना दिसली. त्या चारचाकी वाहनाच्या नंबरवरून आरोपी सचिन गणेश कडपर्यंत पोहोचणे शक्य झाले असून त्याला अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडे चौकशी करण्यात येत असल्याचे काळे पडळ पोलिसांनी सांगितले.