पुणे : पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात झाडे पडण्याच्या घटना घडल्या. रविवारी सायंकाळपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात १९ ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

शहर परिसरात शनिवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीनंतर शहरात मुसळधार पाऊस झाला. रविवारी सकाळी पावसाचा जोर ओसरला. रविवारी दिवसभरात वेगवेगळ्या भागात झाडे पडल्याच्या घटना घडल्या. कोथरुड परिसरातील एमआयटी महाविद्यालयाजवळ, कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता, गंज पेठ, हडपसर भागातील १५ नंबर चौक, कोथरुड बस डेपो, पाषाण, जनवाडीतील अरुण कदम चौक, प्रभात रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वडारवाडी, कसबा पेठ, बिबवेवाडी, पाषाण येथील वीरभद्रनगर, कोथरुडमधील सुतार दवाखाना, महंमदवाडी, नऱ्हे अभिनव काॅलेजजवळ, मुकुंदनगर, विश्रांतवाडी भागात झाडे कोसळली. झाडे कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यात पडलेल्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करून दिले.

हेही वाचा – अखेर पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल सुरू! जाणून घ्या पहिल्या टप्प्यात कोणत्या विमानांचे उड्डाण

हेही वाचा – इच्छुकांमुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपाची डोकेदुखी वाढली, आता शत्रुघ्न काटेंचे शक्तिप्रदर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कात्रज भागातील तलावात महिला बुडाली

कात्रज भागातील गुजरवाडी परिसरात असलेल्या तलावात एक महिला बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेची माहित मिळताच अग्निशमन दलाच्या कात्रज केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. बुडालेल्या महिलेचे नाव समजले नाही.