पुण्यात सलग दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा जोर काल रात्रीपासून वाढल्याने शहरातील बऱ्याच ठिकाणी पाणी भरले आहे.काल झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने पुणे आणि बारामती तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
Maharashtra: Pune District Collector Naval Kishore Ram declares holiday today in all schools and colleges of Pune city, Purandar, Baramati, Bhor and Haveli tehsil of Pune district, following heavy rain in the region.
— ANI (@ANI) September 26, 2019
शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये याकरिता पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये यांना आज गुरुवारी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली.