पुणे : देशातील २०२३-२४ या वर्षांत फलोत्पादन उत्पादन ३५३.१९ दशलक्ष टनांवर जाण्यांचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या ३५५.४८ दशलक्ष टनांच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये अंदाजे २२.९२ लाख टनांनी (०.६५ टक्के) घट होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या २०२३-२४ च्या फलोत्पादनाच्या तिसऱ्या अगाऊ अंदाजानुसार, देशातील २०२३-२४ या वर्षांत फलोत्पादन उत्पादन ३५३.१९ दशलक्ष टनांवर जाण्यांचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या ३५५.४८ दशलक्ष टनांच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये अंदाजे २२.९२ लाख टनांनी (०.६५ टक्के) घट होण्याची शक्यता आहे. असे असले तरीही फळे, मसाले, फुले आणि औषधी वनस्पती आदींच्या लागवडीत वाढ झाली आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Rain : कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधारेचा अंदाज; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्यांत कसा पाऊस पडणार

देशात २०२३-२४ मध्ये  एकूण फळ उत्पादनांत २.२९ टक्के वाढ अपेक्षित आहे. आंबा, केळी, लिंबू, द्राक्ष, सीताफळाच्या उत्पादनात वाढ होण्याचा, तर सफरचंद, संत्रा, मोसंबी, पेरू, लिची, डाळिंब, अननस उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. एकत्रितरीत्या एकूण फळ उत्पादन ११२.७३ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे.

भाजीपाला उत्पादन २०५.८० दशलक्ष टनांवर जाण्याचा अंदाज आहे. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, साबुदाणा (कंद) भोपळा, डांगर, काकडी, कारले, पडवळ आणि भेंडी या पिकांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे. बटाटा, कांदा, वांगी, मोठे रताळे आणि शिमला मिरची या प्रमुख पिकांत घट होण्याची शक्यता आहे. एकूण भाजीपाला उत्पादनात मागील वर्षा इतकेच राहण्याचा अंदाज आहे. मध, फुले, मसाले, सुगंधी आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनात वाढीचा कल आहे.

हेही वाचा >>> केंद्र सरकारचा आदेश खाद्यतेल कंपन्यांनी धुडकावला ? जाणून घ्या, ग्राहकांवर काय परिणाम होणार

२०२३-२४ च्या फलोत्पादनाच्या तिसऱ्या अगाऊ अंदाजाची वैशिष्ट्ये

फलोत्पादन अंदाजे ३५३.१९ दशलक्ष टन

फळे, मध, फुले, मसाले आणि सुगंधी आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनात वाढ शक्य

आंबा, केळी, लिंबू, द्राक्षे, सीताफळ आणि इतर फळांच्या उत्पादनात वाढ शक्य

सफरचंद, मोसंबी, पेरू, लिची, डाळिंब, अननस उत्पादनात घट होणार

भाजीपाला उत्पादन २०५.८० दशलक्ष टन होण्याचा अंदाज

कांद्याचे उत्पादन २४२.४४ लाख टन अपेक्षित

बटाट्याचे उत्पादन सुमारे ५७०.४९ लाख टन अपेक्षित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोमॅटोचे उत्पादन २१३.२० लाख टन होण्याचा अंदाज.