पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर इस्कॉन मंदिर चौकाजवळ आरएमडी शाळेसमोर अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

हेही वाचा – “नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे…”, अजित पवारांचा गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्ञानेश्वर वाल्मीक लवांडे (वय ५०) आणि उषा ज्ञानेश्वर लवांडे (वय ४५, दोघेही रा. कपिल मल्हार बाणेर गाव) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. लवांडे दाम्पत्य बाणेरवरून सकाळी पुरंदर तालुक्यातील कोथळे गावाकडे दशक्रिया विधीसाठी निघाले होते. कात्रज कोंढवा रोड कोंढवा बुद्रुक येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली. या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.