पिंपरी- चिंचवड: सांगवीमध्ये पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली असून पत्नी मृत अवस्थेत आढळली आहे. नेमकं पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली का? यासंबंधी पोलीस तपास करत आहेत. ही घटना आज सकाळी साडेनऊ च्या सुमारास उघड झाली. शाम वाघेला वय-५० असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीच नाव आहे. राजेश्री शाम वाघेला वय- ४५ या मृतावस्थेत आढळल्या आहेत. त्यांच्या तोंडातून रक्तस्त्राव झाल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितल आहे. शाम वाघेला हे आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचे. रात्री त्यांच्यात याच कारणावरून जोरदार वाद झाले होते.
वाघेला यांच्या पत्नी राजश्री यांनी मुलीला फोन लावून याबाबत माहिती दिली होती. उद्या सकाळी येऊन भेटते अस मुलीने सांगितलं होतं. आज सकाळी मुलगी सांगवी येथील घरी गेल्यानंतर दरवाजा ठोठावून आतून प्रतिसाद मिळाला नाही. घाबरलेल्या मुलीने इतर नातेवाईकांना बोलवून पुन्हा दरवाजा ठोठावला. अखेर दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा समोर विदारक चित्र दिसलं. वडिलांनी गळफास घेतलेला तर आई मृतावस्थेत आढळली. या घटनेमुळे विवाहित मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाघेला यांना दोन मुली असून दोघींचा विवाह झालेला आहे. पती पत्नी दोघेच राहत होते. शाम वाघेला यांची पत्नी राजेश्री वाघेला या पिंपरीत शिक्षिका आहे. शाम वाघेला स्वतः रियल इस्टेट चा व्यवसाय करतात. शाम वाघेला यांनी पत्नीची हत्या करून आत्महत्या केली आहे का? या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
“शाम वाघेला यांनी गळफास घेतला आहे. त्यांची पत्नी मृत अवस्थेत आढळलेली आहे. अद्याप त्यांची हत्या आहे की आणखी काही याबाबत पोलीस तपास करत आहेत.”- जितेंद्र कोळी- वरिष्ठ पोलीस निरीक्षक