पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इंटरमिटिएट अभ्यासक्रमा गट एकची परीक्षा ३, ५ आणि ९ मे रोजी, गट दोनची परीक्षा ११, १५ आणि १७ मे रोजी होणार आहे. तर अंतिम अभ्यासक्रमातील गट एकची परीक्षा २, ४ आणि ८ मे रोजी, तर गट दोनची परीक्षा १०, १४ आणि १६ मे रोजी होणार आहे.

हेही वाचा…पुणे : मागासवर्ग आयोगाचे “गरज सरो आणि वैद्य मरो”, मराठा सर्वेक्षणाचे मानधन देण्यास टाळाटाळ

UPSC Releases Exam Schedule for 2025, Registration Dates and Exam Details Announced, upsc exams 2025, upsc exms 2025 exam schedule, Union Public Service Commission, Competitive Examination, marathi news, students, maharashtra students
पुढील वर्षीच्या विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक UPSC कडून जाहीर; नागरी सेवा परीक्षा कधी होणार?
shiv sena and ncp factions manifesto not yet released
जाहीरनाम्यांची प्रतीक्षाच; पहिला टप्पा होऊनही शिवसेना व राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून जाहीरनामे नाहीत
mpsc result, mpsc latest news
एमपीएससीतर्फे मुद्रांक निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियोजित परीक्षेच्या वेळापत्रकात बदल शक्य असल्याचे आयसीएआयकडून जाहीर करण्यात आले होते. तसेच सुधारित वेळापत्रक १९ मार्चला जाहीर करण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार नियोजित वेळापत्रकात बदल करून सुधारित वेळापत्रक आयसीएआयने संकेतस्थळावर जाहीर केले आहे. अधिक माहिती https://www.icai.org/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.