Premium

पुणे: किराणा माल दुकानात बेकायदा गॅस विक्री जीवावर बेतली; गॅस गळती होऊन भाजलेल्या १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी भागात एका किराणा माल दुकानात बेकायदा स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची विक्री करणे जीवावर बेतले असून, गॅस गळतीमुळे गंभीर भाजलेल्या १५ वर्षीय मुलीचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला.

dead
नांदेडजवळ टेम्पोची समोरासमोर धडक( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

पुणे : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी भागात एका किराणा माल दुकानात बेकायदा स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची विक्री करणे जीवावर बेतले असून, गॅस गळतीमुळे गंभीर भाजलेल्या १५ वर्षीय मुलीचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. दुर्घटनेत किराणामाल दुकानदारासह त्याची लहान मुलगी गंभीर भाजले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गीता मन्नाराम चौधरी (वय १५, रा. प्रेम सुपर मार्केट, माळवाडी, किरकटवाडी, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तिचे वडील मन्नाराम चौधरी (वय ४५) आणि लहान बहिणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौधरी यांचे किरकटवाडी भागातील माळवाडी येथे किराणा माल विक्रीचे दुकान आहे. किराणा माल दुकानात ते स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची बेकायदा विक्री करत होते. मोठ्या गॅस सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरण्यासाठी त्यांनी एक गोदाम भाड्याने घेतले होते. त्या ठिकाणी चौधरी बेकायदा गॅस भरायचे. बेकायदा गॅस भरत असताना गुरुवारी (१ जून) सकाळी गॅस गळती झाली आणि आगीचा भडका उडाला. आगीत चौधरी आणि त्यांच्या दोन मुली गंभीर होरपळल्या. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससून रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी (५ जून) गीताचा मृत्यू झाला. चौधरी आणि त्यांच्या लहान मुलीची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Illegal sale of cooking gas cylinders in grocery shops in kirkatwadi area on sinhagad road pune print news rbk 25 amy