पिंपरी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. यावर आता त्यांनी खुलासा केला आहे. काल मी बारामतीला होतो. त्याबाबत अमित शहा यांचे कार्यालय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविले होते असे पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज रविवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. दिवसभर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या आरत्या करणार आहेत. चिंचवडगावातील मोरया गोसावी यांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा : पक्षातील बंडखोरीनंतरही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो, चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठा, धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. आरक्षणाबाबत कायद्याच्या चौकटीत निर्णय घेण्याचा प्रयत्न चालू आहे. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. पण, ते उच्च न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला. तो निर्णय उच्च न्यायालयात टिकला पण सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार घटनेच्या तरतुदीत टिकेल असे आरक्षण देण्यास महायुतीचे सरकार कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधानाबाबत बोलण्यास नकार देतानाच राज्यात वाचाळविरांची संख्या वाढल्याचा टोलाही त्यांनी लगविला.