पिंपरी- चिंचवड : भाजपच्या वतीने काही भागांमध्ये राम मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. महाराष्ट्रात सर्व देशभराच्या कानाकोपऱ्यातून या सोहळ्यासाठी नागरिक जाण्याच्या तयारीत आहेत. असं असलं तरी अनेक नागरिक हे अयोध्येत जाऊ शकत नाहीत. अशा व्यक्तींसाठी भाजपच्या वतीने शहरातील काही भागांमध्ये राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. अनेक नागरिक फोटो आणि सेल्फी काढत आहेत.
राम मंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारी मोठ्या उत्साहात होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरासह परदेशातून काही मान्यवर येणार आहेत. असे सांगितले जात आहे. राम मंदिर हा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. त्यामुळे बहुप्रतिक्षित सोहळ्यासाठी राज्यातील नागरिक देखील हा सोहळा अनुभवण्यासाठी अयोध्येत जाण्याची शक्यता आहे. हा सोहळा शहरात देखील अनुभवता यावा यासाठी राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती शहरातील काही भागांमध्ये ठेवण्यात आली आहे. अशी माहिती भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली आहे. राम मंदिराच्या प्रतिकृती सोबत अनेक जण फोटो आणि सेल्फी काढत आहेत. नागरिकांनी देखील याबाबत समाधान व्यक्त केलं आहे.