पिंपरी : मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून एक कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन देण्याचे आणि मुलीला नोकरी लावण्याचे आमिष दाखत महिलेची चार लाखांची फसवणूक करणाऱ्या महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तळेगाव दाभाडे परिसरात उघडकीस आला. याबाबत महिलेने तळेगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार गावडे नावाची महिला आणि राजेश चव्हाण (रा. चिंचवड) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : पिंपरीत दांडियातील वादातून टोळक्याची दोघांना कोयत्याने मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गनाथ साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आयुर्वेदिक उत्पादने विक्रीची कामे करतात. महिला आरोपीने मंत्रालयात नोकरीला तर राजेशने बँकेत नोकरीला असल्याचे सांगितले. फिर्यादी, त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून एक कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन देतो असे सांगितले. फिर्यादीच्या मुलीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत चार लाख रुपये घेतले. कर्ज मंजूर न केल्याने आणि मुलीला नोकरी न लावल्याने आरोपींकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मोबाईल फोन बंद करुन ठेवला. महिला मंत्रालयात आणि राजेश बँकेत कामाला नसल्याचे समजताच पोलिसांत धाव घेतली.