पिंपरी : चोरी केलेले मोबाईल फोन विक्रीसाठी आलेल्या एका सराईत चोरट्याला गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली. चोरटा पुणे रेल्वे स्थानकावर राहत होता. दिवसभर मोबाईल चोरी करून त्याची विक्री करत होता. जगदीश रामप्रसाद महतो (वय ३१, रा. साहेबगंज, झारखंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील बस स्थानक, बाजारपेठ अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना घडत असल्याने त्यावर लक्ष देण्याच्या सूचना गुन्हे शाखेला देण्यात आल्या होत्या. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अंमलदार संदेश देशमुख आणि तेजस भालचिम यांना माहिती मिळाली कि, चोरी केलेले मोबाईल फोन विक्रीसाठी एक व्यक्ती निगडी मधील पवळे उड्डाण पुलाजवळ येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला.

हेही वाचा : पुणे : जिल्ह्याच्या एकात्मिक वाहतुकीसाठी तीस वर्षांचा आराखडा, १.२६ लाख कोटींचा खर्च अपेक्षित

जगदीश याला पोलिसांनी सापळा लावल्याची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये आयफोन, विवो, ओपो, रियलमी, रेडमी कंपन्यांचे १६ मोबाईल फोन आढळून आले. पोलिसांनी तीन लाख २० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन जप्त करत जगदीश याला अटक केली.

हेही वाचा : पुणे : जिल्ह्याच्या एकात्मिक वाहतुकीसाठी तीस वर्षांचा आराखडा, १.२६ लाख कोटींचा खर्च अपेक्षित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याने निगडी, पिंपरी, चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण परिसरातून गर्दीच्या ठिकाणावरून मोबाईल फोन चोरी केल्याचे सांगितले. निगडी, दौंड, सासवड, दौंड आणि स्वारगेट पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी जगदीश हा मूळचा झारखंड येथील असून तो पुणे रेल्वे स्थानकावर राहत होता. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, दीपक खरात, देवा राऊत, संदेश देशमुख, तेजस भालचिम यांनी केली.