पुणे : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ऊरळी कांचन भागात घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. सोनाली धनाजी धुमाळ (वय २५, रा. टिळेकरमळा, ऊरुळीकांचन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : लातूरमध्ये कोयत्याने वार करून पिग्मी एजंटचे एक लाख रुपये पळवणाऱ्या आरोपीला जेजुरी पोलिसांनी केली अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली विवाहित होती. विवाहानंतर तिचा घटस्फोट झाला. ऊरळी कांचन परिसरात ती माहेरी राहत होती. गेल्या वर्षभरापासून ती पोलीस भरतीची तयारी करत होती. आई-वडील घराबाहेर पडल्यानंतर तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सोनालीच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.