पुणे : भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बुधवारी धमकीचा ई-मेल आला होता. यामध्ये महाविद्यालय आणि वसतिगृह बॉम्बने उडवले जाऊ शकते असा संदेश होता. पोलिसांनी हा ई-मेल गांभीर्याने घेऊन संपूर्ण महाविद्यालय बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या (बीडीडीएस) मदतीने तपासले. मात्र, संशयास्पद असे काहीही आढळले नाही. याप्रकरणी महाविद्यालयाचे डॉ. मंदार दत्तात्रय करमरकर (वय ५५, रा. पर्वती दर्शन) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात ई-मेल धारकाविरुद्ध तक्रार दिली आहे.

हे ही वाचा… पुणे : मद्यपी चालकांची ‘झिंग’ उतरणार, अडीच हजार जणांवर कारवाई; ५०० परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या ई-मेल आयडीवर एका व्यक्तीने दोन वेळा ई-मेल पाठवला. यामध्ये तामिळनाडूतील एका घटनेचा संदर्भ देत महाविद्यालय आणि वसतिगृह परिसरात बॅम्बस्फोट होणार असल्याची माहिती होती. डॉ. मंदार करमरकर यांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय आणि वसतिगृह परिसराची तपासणी केली. यावेळी बीडीडीएस पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली होती. ई मेलची तांत्रीक तपासणी केली असता, तो परदेशातून आल्याचे स्पष्ट झाले. ई मेलमध्ये स्पष्टपणे अशी कोणतीही धमकी नव्हती. मेल करणाऱ्याला नक्की काय म्हणायचे हे पाठवलेल्या संदेशात कळत नव्हते. मात्र ई-मेल मुळे पोलिसांची धावपळ उडाली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील करत आहेत.