पुणे : विश्रांतवाडी भागातून एक कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. पुण्यात मेफेड्रोनच्या विक्रीस पाठविणाऱ्या गुजरातमधील एका बड्या तस्कराला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. तस्कराने पुण्यासह देशातील वेगवेगळ्या भागात मेफेड्रोनची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मोहम्मद अस्लम मोहम्मद इस्माईल मर्चंट (रा. जंबुसर, जि.भरूच, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे. विश्रांतवाडीतील लोहगाव भागात एका सदनिकेत मेफेड्रोनचा साठा असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून एक कोटी रुपयांचे ४७१ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. याप्रकरणी श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित बेंडे, निमीष आबनावे यांना अटक करण्यात आली. आरोपींनी कुरिअरमार्फत मेफेड्रोन घरपोहोच दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कुरिअर कंपनीतील कर्मचारी विश्वनाथ कोनापुरे (सध्या रा. काळेपडळ, हडपसर, मूळ रा. सोलापूर) याला अटक केली.

हेही वाचा : CM Eknath Shinde : “…तर दीड हजारांचे तीन हजार होतील”, लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान

Notices to bakers in Kalyan Dombivli using polluting fuel
प्रदुषणाकारी इंधन वापरणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील बेकऱ्यांना नोटिसा
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Gold worth Rs 2 crore stolen from jewellery artisans case registered
दागिने घडविणाऱ्या कारागिरांकडून पावणेदोन कोटींचे सोने चोरी, पश्चिम बंगालमधील कारागिरांविरुद्ध गुन्हा दाखल
Auction vehicles of developer Andheri,
मालमत्ता कर थकवणाऱ्या अंधेरीतील विकासकाच्या तीन गाड्यांचा लिलाव
Drugs worth one crore seized in Dhule district
धुळे: अबब… एक कोटीचे अमली पदार्थ जप्त
Pench tiger project administration, Villagers
पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाविरोधात गावकरी रस्त्यावर
Mahajyotis decision to withdraw from the Same Policy process
‘समान धोरणा’चा फज्जा! ‘महाज्योती’चा प्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा निर्णय
cybercriminals india post fraud marathi news
विश्लेषण: सायबर गुन्हेगारांकडून ‘पोस्टल स्कॅम’चा वापर… काय आहे हा कुरिअर फसवणुकीचा नवा प्रकार?

पुण्यातील मेफेड्रोन विक्री प्रकरणाचा मुख्य सूत्रधार निमीष आबनावे असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी आबनावेची चौकशी केली. तेव्हा गुजरातमधील मेफेड्रोन तस्कर मोहम्मद मर्चंट याने अमली पदार्थ विक्रीस दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांचे पथक गुजरात भरुच येथे गेले. सापळा लावून मर्चंट याला ताब्यात घेण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी एकचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक नितीन नाईक, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, अविनाश लाहोटे, नितेश जाधव, दयानंद तेलंगे, अविनाश कोंडे यांनी ही कारवाई केली.