पुणे : कर्नाटक विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढण्यात यावे, असे विधान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव प्रियांक खर्गे यांनी केले आहे. या विधानाच्या निषेधार्थ आज भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष करण मिसाळ यांच्या नेतृत्त्वाखाली पुण्यातील सारसबाग जवळील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यासमोर प्रियांक खर्गे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.

हेही वाचा : ‘इझी पे’ कंपनीवर कर्मचाऱ्यांनीच मारला करोडोंचा इझी डल्ला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी करण मिसाळ म्हणाले की,देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सावरकर यांच योगदान मोठं आहे.पण आजवर काँग्रेसकडून सावरकर यांच्याबद्दल चुकीची माहिती समाजासमोर आणण्याचं काम करण्यात आलं आहे. त्याच दरम्यान प्रियांक खर्गे यांनी कर्नाटक विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढण्यात यावे, असं विधान केलं आहे. ते निषेधार्थ असून प्रियांक खर्गे यांनी माफी मागावी. अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.