गणेश विसर्जन मिरवणुकीत डिजे वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. पण पुण्यातील बहुतांश गणेश मंडळांनी या आदेशाचे उल्लंघन केले. पुणे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर डीजे वाजवण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी ९८ मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर यंदा २६ तास ३६ मिनिट गणेश विसर्जन मिरवणूक चालली.

मुंबई उच्च न्यायालयाने डीजे वाजवण्यावर बंदी घातली आहे. या आदेशाला पुण्यातील गणेश मंडळीनी केराची टोपली दाखवत कुमठेकर रोड, शिवाजी रस्ता,दांडेकर पूल,नाना पेठ, भवानी पेठ यासह अनेक भागात मोठ्या प्रमाणावर डीजे वाजवण्यात आले. शहरातील ९८ मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या मिरवणुकीमधील ५७ साऊंड चालकांचे मिक्सर जप्त करण्यात आले आहेत तसेच यामध्ये १२ जणांना ताब्यात देखील घेण्यात आले असून अद्याप ही काही भागात नियमांचे पालन न करणाऱ्या गणेश मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे काम चालू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड मिरवणूकीत दारू पिऊन आलेल्या ७१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर ८० ध्वनीप्रदुषणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.