पुणे : पुणे शहरातील विविध भागात सोनसाखळी,कोयता गँगकडून वाहनांची तोडफोडीच्या घटना घडत आहे.त्या घटना दरम्यान पुणे शहराचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चतु: शृंगी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात दोन चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेले माहितीनुसार,माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांच्या पत्नी संगीता गायकवाड या २३ तारखेला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी संगीता गायकवाड यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दोन्ही चोरटे घटना स्थळावरून पसार झाले. या घटने प्रकरणी आमच्याकडे फिर्याद येताच,दोन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.