पुणे : सहकार विभागाशी निगडित कामकाज पारदर्शक व्हावे, यासाठी ‘ई-क्युजे’ प्रणालीअंतर्गत गृहनिर्माण संस्थांसाठीच्या ऑनलाइन मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेला (डीम्ड कन्व्हेयन्स) सोमवारपासून सुरुवात झाली.

राज्यात सुमारे सव्वादोन लाख सहकारी संस्था आहेत. या संस्थांचे कामकाज महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि नियम १९६१ मधील तरतुदीनुसार निबंधकामार्फत करण्यात येते. नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकारच्या ‘ई-गव्हर्नस’ धोरणांतर्गत ‘ई-क्युजे’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ‘ई-क्युजे’ अंतर्गत पारदर्शक पद्धतीने कागदविरहित पुनर्विचार आणि अपील प्रक्रिया प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सर्व सेवासुविधा घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रणालीअंतर्गत पहिल्या टप्प्यात मानीव अभिहस्तांतरणासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या विविध कलमांतर्गत अर्ज, अपील आणि पुनर्रीक्षण अर्ज; तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत अवैध सावकारीविरुद्ध तक्रार अर्ज या सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सेवांना सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी दिली.