पुणे : सामूहिक लग्न सोहळ्यामुळे गोर-गरिबांच्या पैशांची बचत होते. लग्न कार्यामध्ये होणारा नाहक खर्च कमी होतो. अप्पासाहेब शिंदे यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ५४ जोडप्यांचा केलेला सामूहिक विवाह सोहळा हा कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहे. सामूहिक लग्न सोहळ्यामध्ये हुंड्यासारख्या प्रथा बंद होतात आणि अनिष्ट प्रथा परंपरांना त्यामुळे फाटा दिला जातो, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच घरातील लग्नकार्यामुळे आई वडील कर्जबाजारी झाल्याचे चित्र अनेक घरांमध्ये बघायला मिळते. त्यामुळे अशा सामूहिक विवाह सोहळ्याची समाजाला गरज असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : Ladaki Bahin Yojana : “पुढच्या वेळी आईची मते मागू नका, तुमच्या…”, लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या कचरा वेचणाऱ्या महिलेचा संताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट’चे आणि ‘महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष आणि केमिस्टरत्न जगन्नाथ शिंदे उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’तर्फे कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलत होते. यावेळी आमदार हेमंत रासने,आमदार चेतन तुपे,माजी महापौर दत्तात्रय धनकवडे आदी मान्यवर उपस्थित होते.