पुणे: महापालिका भवन परिसरात नदीपत्रात मध्यरात्री पडलेल्या तरुणाची सुटका अग्नीशमन दलाच्या जवानांनी केली. छत्रपती शिवाजी पुलाजवळ नदीत एक जण पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून कसबा अग्निशमन केंद्राला कळविण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन रवाना करण्यात आले.

जवान घटनास्थळी पोहोचताच त्यांनी एक तरुण नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकल्याचे पाहिले. जवानांनी दोरी आणि लाईफ जॅकेटचा वापर करून पाच मिनिटात तरुणाची सुखरुप सुटका केली. मदतकार्यात जीवरक्षक राजू काची यांनी सहकार्य केले. तर सोमनाथ निशाद असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशतील असून, तो पाण्यात कसा पडला याची नेमकी माहिती मिळू शकली नाही.

हेही वाचा : अल्पवयीन युवतीचा विवाह, मुलगी गर्भवती; मुलीच्या पतीसह सासू, आई, वडिलांविरुद्ध गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसबा अग्निशमन केंद्रातील वाहनचालक संतोष चौरे तसेच जवान हरिश बुंदेले, राजू जगदाळे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजेंद्र महाडिक, आतिश नाईकनवरे, सनी लोखंडे यांनी ही कामगिरी केली.