पुणे : बालगंधर्व रंगमंदिरात वातानुकूलन यंत्रणेत स्फोट झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेनंतर प्रेक्षागृहात धूर झाल्याने घबराट उडाली. मात्र, प्रेक्षागृहातील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून परिस्थिती हाताळल्याने दुर्घटना टळली.

बालगंधर्व रंगमंदिरात रात्री साडेनऊ वाजता ‘दोन वाजून २२ मिनिटांनी’ नाटकाचा प्रयोग होता. या नाटकासाठी प्रेक्षक प्रेक्षागृहात येण्यापूर्वीच वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याची घटना घडली. बाल्कनीतून मोठ्या प्रमाणावर धूर आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रेक्षागृहातील कर्मचाऱ्यांनी त्वरीत कार्यवाही करत नियंत्रण मिळवले. सुदैवाने यावेळी प्रेक्षागृहात प्रेक्षक नव्हते. या घटनेनंतर प्रेक्षागृहाबाहेर जमलेल्या प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला आणि नाटकाचा प्रयोग सुरळीत पार पडला.