पुणे : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राममंदिर उद्घाटनाच्या आणि राम मूर्ती प्रतिष्ठापनेचे घरोघरी जाऊन अक्षता वितरणाची सोमवारपासून सुरुवात झाली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या पुणे महानगर समितीच्यावतीने माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह उद्योजक, धार्मिक प्रमुख आणि अन्य मान्यवरांना अक्षता वितरण आणि निमंत्रणं देण्यात आली.  

रामजन्मभूमी न्यासासाठी पुणे महानगर समिती राबविण्यात येत असलेल्या या अभियानाच्या पहिल्या दिवशी कॅम्प गुरुद्वाराचे अध्यक्ष चरणजीतसिंह साहनी, रेंजहिल्स येथील गुरुद्वाराचे ग्यानी जसबीर सिंगजी, जैन मुनी श्री उपाध्याय, श्री गौतम मुनीजी महाराज, कायनेटिक समूहाचे अध्यक्ष अभय फिरोदिया, बजाज ऑटोचे संजीव बजाज यांच्यासह अनेक मान्यवरांना अक्षता देऊन निमंत्रण देण्यात आले.

हेही वाचा : बँक अधिकाऱ्यांना मिळणार धडे, नव्या अभ्यासक्रमाची निर्मिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अभियानाचा तपशील अजित पवार यांनी जाणून घेतला. न्यासाच्या वतीने २१ हजारांहून अधिक रामसेवक १५ जानेवारीपर्यंत घरोघरी जाऊन अक्षतांचे निमंत्रण देणार आहेत. ११ लाखांहून अधिक घरांमध्ये निमंत्रण देण्याचे गृहसंपर्क अभियान पूर्ण झाल्यानंतर २२ जानेवारीपर्यंत शहरातील दोन हजारांहून अधिक मंदिरांमध्ये भजन, रामनाम जप, आरती, रांगोळी, व नृत्याचे कार्यक्रम, पथनाट्य सादरीकरण, शहरातील कलाकार कट्ट्यावर विविध कलांचे सादरीकरण, सोसायटी आणि मंदिरांमधून रामसंकीर्तन असे विविध कार्यक्रम होणार आहेत.