पुणे : लोहियानगर भागात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांना आठ ते नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अक्षय दत्ता ढावरे (रा. लोहियानगर, गंज पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. ढावरे हे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे कसबा मतदार संघाचे उपाध्यक्ष आहेत. अतुल खान, सलमान उर्फ बल्ली शेख यांच्यासह नऊजणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अक्षयचे भाऊ नागेश ढावरे याने फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : Video: पतीत पावन संघटनेकडून फर्ग्युसन रोडवरील ‘त्या’ पबची तोडफोड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठच्या सुमारास अक्षय आणि त्यांचे मित्र शंकरशेठ रस्ता परिसरातील एकबोटे कॉलनीतील एका हॉटेलवर चहा पित होते. त्यावेळी दुचाकींवरून आरोपी आले. ‘लोहियानगरमें मसिहा बन रहा है, आज इसको मारने का’ असे म्हणून आरोपींनी अक्षय यांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यांच्यावर कोयता आणि पालघनने हल्ला केला, असे ढावरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.