पुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातून मूळ गावी जाणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांची संख्या जास्त असल्याने या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खासगी वाहतुकीला मोठी गर्दी असते. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्यातून दिवाळीच्या काळात ५१२ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. या गाड्या स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवारी), खडकी आणि पिंपरी-चिंचवड आगारातून सोडण्याचे नियोजन आहे.

एसटीच्या पुणे विभागाकडून ८ ते ११ नोव्हेंबरदरम्यान जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. या गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण सुरू झाले आहे. प्रवाशांना आरक्षण केंद्रावर जाऊन अथवा ऑनलाइन तिकिटाचे आरक्षण करता येईल. स्वारगेट आगारातून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात गाड्या सोडल्या जाणार आहेत. याचबरोबर शिवाजीनगर आगारातून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात गाड्या सोडल्या जाणार आहेत.

हेही वाचा : पुणे : नकटी बोलल्याने सासू-सुनेत वाद; सुनेने केला सासूच्या हातावर सुरीने वार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यात नोकरी आणि शिक्षणानिमित्त बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण खूप आहे. दिवाळीच्या सुटीनिमित्त ते त्यांच्या मूळगावी जातात. प्रवाशांची संख्या जात असल्याने अनेकदा गाड्यांचे तिकीट आरक्षणही मिळत नाही. त्यामुळे एसटीच्या पुणे विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केल्याने गावी जाण्यासाठी प्रवाशांची सोय होणार आहे.