पुणे : नगर रस्त्यावर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून पावणेतीन किलो गांजा, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सागर कुमार (वय २३), शिवम सरोज (वय २२, दोघे मूळ रा. गोरीडी, संत बिरदास नगर, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चंदननगर भागातील नागपाल रस्त्यावर दोघे जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून सागर आणि शिवम यांना पकडले. त्यांच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा आढळून आला. दोघांकडून पावणेतीन किलो गांजा, मोबाइल संच असा ६९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Arunachal Pradesh Manipur girls trafficked in Nagpur Ginger Mall in the name of spa crime news
‘स्पा’च्या नावावर सेक्स रॅकेट; नागपूरच्या जिंजर मॉलमध्ये अरुणाचल प्रदेश, मणिपूरच्या तरुणींकडून देहव्यापार
Buldhana, Police Seize 4 Pistols, Live Cartridges, Buldhana Madhya Pradesh Border, Buldhana Madhya Pradesh Border Operation, police operation, pistols seize in buldhana, buldhana crime news, crime news, buldhana news, lok sabha 2024,
बुलढाणा : चार पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात कारवाई
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Gadchiroli Police Arrests Two Female Naxalites One Supporter With Reward of 5 and half Lakhs
साडेपाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक; सी- ६० पथकाची कारवाई

हेही वाचा…पुणे : परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थेत प्रवेशाचे आमिष; लाखो रुपये उकळणाऱ्या ‘माय कॉलेज खोज’ कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा

पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, सहायक निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अरविंद कुमरे, महेश नाणेकर, विकास कदम, दिलावर सय्यद, श्रीकांत शेंडे, अविनाश संकपाळ यांनी ही कारवाई केली.