पुणे : वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा २० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२३ दरम्यान तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुण्यातील भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी संगमवाडी येथे शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पण या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती व भीम आर्मी एकता बहुजन संघटनेकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. कार्यक्रमाला राजकीय, उद्योग क्षेत्रातील मंडळीनी हजेरी लावल्याचे पाहण्यास मिळत आहे.

हेही वाचा : आळंदी : इंद्रायणी नदीतील जल प्रदूषणावर सामाजिक संस्था आक्रमक; नदी पात्रात उतरून आंदोलन

आज कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवशी दिव्य दरबार कार्यक्रमासाठी विविध भागांतून भाविक आले होते. सभा मंडपातील विविध भाविकांना व्यासपीठावर बोलावून त्यांच्या समस्या आणि त्यावर उपाय सांगताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री पहावयास मिळाले. त्याच दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याला धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी बोलावून त्याच्या समस्या आणि त्यावर उपाय सांगितले. ते सर्व ऐकून पोलिस अधिकाऱ्याला अश्रू अनावर झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Story img Loader