पुणे : कल्याणीनगर भागातील एका मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी व्यवस्थापकासह दोघांना अटक करण्यात आली.

याप्रकरणी हर्षवर्धनसिंग भारत मोडासिया (वय २२, रा. कोरेगाव पार्क) आणि आसाफुल इस्लाम मुजिबुर रहिमान (वय २३, मूळ रा. आसाम) यांना अटक करण्यात आली. याबाबत पोलीस कर्मचारी मयूरी नलावडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर भागात ‘निद्रा बॉडी स्पा’ येथे मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खातरजमा करून तेथे छापा टाकला. कारवाईत तीन तरुणींना ताब्यात घेतले, तर दोघांना अटक केली. पार्लरचालक जुनैद फारूख शेख पसार असून, त्याचा शोध सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार (पिटा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय ठाकर तपास करत आहेत. बाणेर भागातील दोन मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांविरुद्ध कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.