scorecardresearch

Premium

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून महिलेवर चाकूने वार

अशोक लक्ष्मण आढाव (वय ३१, रा. राजीव गांधीनगर, विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

wife stabbed by husband in pune, pune crime news, wife suspicion on husband
चारित्र्याच्या संशयातून पतीकडून महिलेवर चाकूने वार (संग्रहित छायाचित्र)

पुणे : चारित्राच्या संशयातून महिलेवर चाकूने वार केल्याची घटना विमाननगर भागात घडली. याप्रकरणी पतीला विमाननगर पोलिसांनी अटक केली. अशोक लक्ष्मण आढाव (वय ३१, रा. राजीव गांधीनगर, विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत त्याच्या पत्नीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री आढाव आणि त्याची पत्नी विमाननगर भागातील एका उपाहारगृहात जेवण करण्यासाठी गेले होते.

हेही वाचा : मानवी हस्तक्षेपामुळे दरवर्षी ,२०० कोटी टन धूळ वातावरणात; शेतजमिनी नापीक होण्याच्या धोक्यात वाढ

How names of two lions Sita and Akbar
सिंहाचं नाव अकबर अन् सिंहिणीचं नाव सीता ठेवल्याच्या वादात मोठी कारवाई; त्रिपुराच्या ‘त्या’ अधिकाऱ्याला केले निलंबित
mumbai uddhav thackeray s shivsena mla ravindra waikar marathi news, mla ravindra waikar marathi news
जोगेश्वरी सुप्रिमो क्लब प्रकरण : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची पालिकेची तयारी
pune, police, suspended, Sassoon hospital, Accused, escapes, Sharad Mohol, threatens, wife,
पुणे : सराईत गुन्हेगार शरद मोहोळच्या पत्नीला धमकी देणाऱ्या आरोपीचे ससूनमधून पलायन…दोन पोलीस निलंबित
youth murdered two wheeler overtakin, dispute amravati
अमरावती : दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या

आढावने चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे पत्नी उपाहागृहातून बाहेर आली. आढावने उपाहारगृहासमोर पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. तुझे एकाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. त्याने पत्नीवर चाकूने हल्ला चढविला. आढावने केलेल्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune wife stabbed by husband on suspicion of character pune print news rbk 25 css

First published on: 04-12-2023 at 09:38 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×