scorecardresearch

Premium

देवदर्शनाला निघालेल्या दुचाकीस्वार दाम्पत्याला ट्रकची धडक, सहप्रवासी महिलेचा मृत्यू

दुचाकीस्वार दाम्पत्याला भरधाव ट्रकने धडक दिल्याने सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात घडली.

pune accident, pune woman dies in accident at kharadi
देवदर्शनाला निघालेल्या दुचाकीस्वार दाम्पत्याला ट्रकची धडक, सहप्रवासी महिलेचा मृत्यू (संग्रहित छायाचित्र)

पुणे : देवदर्शनासाठी निघालेल्या दुचाकीस्वार दाम्पत्याला भरधाव ट्रकने धडक दिल्याने सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पूनमदेवी शिवनंदन प्रसाद (वय ३५, रा. महावीरनगर, वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत शिवनंदन प्रसाद (वय ४०) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : पुणे : रिक्षाप्रवासी महिलेच्या पिशवीतून रोकड चोरली, सेनापती बापट रस्त्यावरील घटना

man committed suicide mumbai
मुंबई : मित्राची हत्या करून आरोपीचीही आत्महत्या
loksatta satire article on ashok chavan name in adarsh scam join bjp
उलटा चष्मा : अपघातानंतरचा ‘आ’!
The body of a young man who had been missing for the last three days in Vishrambagh was found in the Krishna river sangli
बेपत्ता तरुणाचे पार्थिव कृष्णा नदीत, आत्महत्येचा संशय ?
Malad
माणुसकीला काळिमा! मुंबईत गटारात फेकलेल्या गोणीत सापडलं नवजात बालक, प्राणीप्रेमीच्या ‘या’ कृतीमुळे मिळालं जीवदान

दुचाकीस्वार प्रसाद दाम्पत्य रांजणगाव येथील गणपती मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. पुणे-नगर रस्त्यावर खराडी भागात शनिवारी (७ ऑक्टोबर) दुपारी बाराच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीस्वार प्रसाद दाम्पत्याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पूनमदेवी यांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार शिवनंदन यांना दुखापत झाली. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. पाठक तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune woman dies in accident at kharadi going to ranjangaon ganpati mandir with husband pune print news rbk 25 css

First published on: 08-10-2023 at 20:13 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×