पुणे : विवाह नोंदणीविषयक संकेतस्थळावर झालेली ओळख एका तरुणीला महागात पडली. विवाहाच्या आमिषाने तरुणीची चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी कोथरुड भागात राहायला आहे.

हेही वाचा : ‘राष्ट्रवादीने सिंचन, बँक घोटाळा केला ना? मग चौकशी करा’, मोदींना आव्हान देताना अजित पवारांची कोंडी

Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
married woman murder her son
सोलापूर : लग्नापूर्वीचे प्रेमप्रकरण उजेडात येऊ नये म्हणून विवाहितेने केला मुलाचा खून अन् स्वतः केले विषप्राशन
non marathi mobile phone professionals
अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा

तरुणीने विवाह नोंदणी संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. त्यानंतर तरुणाने तरुणीशी ओळख वाढविली. विवाह करण्यास उत्सुक असल्याचे सांगून त्याने तिला जाळ्यात ओढले. तरुणीला वेगवेगळी कारणे सांगून त्याने पैसे उकळले. तरुणीने तीन बँकांच्या खात्यात वेळोवेळी चार लाख दहा हजार रुपये जमा केले. आरोपीच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर तो वापरत असलेले चार ते पाच मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तरुणीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांनी संबंधित गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.