scorecardresearch

पुणे: महापालिकेच्या मिळकत कर अधिकाऱ्याला धक्काबुक्की, कोरेगाव पार्क भागातील घटना

कोरेगाव पार्क परिसरात पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली.

पुणे: महापालिकेच्या मिळकत कर अधिकाऱ्याला धक्काबुक्की, कोरेगाव पार्क भागातील घटना
फोटो-इंडियन एक्स्प्रेस (पुणे महानगरपालिका)

कोरेगाव पार्क परिसरात पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळकत कर अधिकारी वसंत सुतार ( रा. शिवाजीनगर ) यांनी फिर्याद कोरेगाव पार्क पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोरेगाव पार्कमधील ज्वेल हौसा या इमारतीमधील एका कार्यालयाचा कर थकला होता. त्याबाबत महापालिकेने त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्याची दखल घेतली न गेल्याने पालिकेचे पथक कारवाई करण्यासाठी तेथे गेले होते; तसेच जप्ती वॅारंट घेऊन तेथे गेले होते. त्यावेळी तेथील एकाने सुतार आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश वराळ तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 17:10 IST

संबंधित बातम्या