पुणे : परकीय आक्रमणे, शिवराज्याभिषेक, मराठ्यांनी लावलेले अटकेपार झेंडे, ब्रिटिशांचे आगमन, उमाजी नाईक यांचा ब्रिटिशांविरोधातील लढा, १८५७ चे स्वातंत्र्यसमर आणि त्यानंतर अनेक क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान, चापेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रॅण्डचा केलेला वध अशा विविध प्रसंगातून स्वातंत्र्यसमराचे महानाट्य शनिवारी उलगडले.

हेही वाचा >> पालखी सोहळ्यासाठी चार हजार पोलिसांचा बंदोबस्त

निमित्त होते शिक्षण प्रसारक मंडळी, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव समारोह समिती, पुणे महानगर, भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि चापेकर बंधूंच्या पराक्रमाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘स्वातंत्र्याचा क्रांतियज्ञ’ या महानाट्याचे. या महानाट्याला पुणेकरांनी उस्फूर्त दाद दिली. पुण्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या वेळी मोठी हजेरी लावली होती.

PHOTOS : महानाट्यातून उलगडला ‘स्वातंत्र्याचा क्रांतियज्ञ’; पुणेकरांनी अनुभवला क्रांतिकार्याचा रोमहर्षक इतिहास

लहुजी वस्ताद आणि वासुदेव बळवंत फडके यांच्यातील संवाद, लोकमान्य टिळक आणि चापेकर बंधूंचे संवाद, स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, मुंबईतील राणी विक्टोरियाच्या पुतळ्याला चापेकर बंधूंनी फासलेले काळे आदी प्रसंगांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

हेही वाचा >> यंदा वारीत महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक विशेष सोयीसुविधा, महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ अभियानाचा पुण्यातून प्रारंभ

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव समारोह समितीचे अध्यक्ष आणि पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, पश्चिम महाराष्ट्र संघचालक नानासाहेब जाधव, प्रा. मोहन शेटे, शाहीर हेमंत मावळे या वेळी उपस्थित होते.