उद्योजकांची गैरसोय दूर करण्याच्या उद्देशातून बारामतीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय लवकरच सुरू होणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या माध्यमातून बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे, अशी माहिती बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.

जामदार म्हणाले, बारामती औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांना भूखंड मागणीचा अर्ज करणे, मंजुरीनंतर रक्कम भरणे, करारनामा करणे, भूखंडाचा ताबा देणे, बँक कर्ज प्रकरण करणे, भूखंडाचे विभाजन, हस्तांतर, बांधकामास मुदतवाढ देणे, नवीन भूसंपादन ही महत्त्वाची कामे एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयाकडून केली जातात. त्यासाठी बारामती पणदरे, भिगवण, कुरकुंभ, जेजुरी, इंदापूर, फलटण एमआयडीसी क्षेत्रातील भूखंडधारकांना पुण्याला जावे लागत होते. प्रत्येक कामाला वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने उद्योजकांचा बहुमूल्य वेळ व पैसा वाया जाऊन मनस्ताप सहन करावा लागत होता. उद्योजकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी बारामतीमध्येच एमआयडीसीचे स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय सुरू करावे यासाठी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून एमआयडीसी मुख्यालयाकडे मागणी करण्यात आली.

Jijau Vikas Party Announces Candidates for Bhiwandi and Palghar Lok Sabha Seats
जिजाऊ विकास पार्टी भिवंडी व पालघर लोकसभा लढवणार
Vijay Wadettiwar
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीपूर्वीच केली ‘चांगल्या खात्या’ची मागणी, जाणून घ्या कारण ?
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
Displeasure of office bearers in BJPs election planning meeting
अलिबाग : भाजपच्या निवडणूक नियोजन बैठकीतही पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर…

हेही वाचा – ‘छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीरच’; आमदार शिवेंद्र राजे भोसले

हेही वाचा – पुणे : मुंबईला गोमांस घेवून जाणारा टेम्पो पकडला, खडकी भागात दोन टन गोमांस जप्त

बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत उद्योग विभागाने बारामतीमध्ये स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आता लवकरच बारामतीमध्ये एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय सुरू होणार आहे.