scorecardresearch

गतीअवरोध तंत्राचा वापर करुन सुखोईचा अपघात टाळण्यात वैमानिकांना यश

पुण्यातील लोहगाव एअर फोर्स स्टेशनवरील घटना

Indian Air Force, fighter aircraft, Sukhoi, Pilots
गतीअवरोध तंत्राचा वापर करुन सुखोईचा अपघात टाळण्यात वैमानिकांना यश ( संग्रहित छायाचित्र )

पुणे : भारतीय हवाईदलाच्या ताफ्यातील सुखोई – ३० – एमकेआय या लढाऊ विमानासाठी गतीअवरोध तंत्राचा म्हणजेच एअरक्राफ्ट अरेस्टर बॅरिअर वापर करुन अपघात टाळण्यात वैमानिकांना यश आले आहे. पुण्यातील लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशनवर ही घटना घडली.

हेही वाचा… शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत उमेदवारांना पाच हजार रुपये विद्यावेतन, राज्य शासनाचा निर्णय

हेही वाचा… रेल्वेची गाडी पुढेच सरकेना…, वर्षानुवर्षे समस्या कायम; सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चेचे गुऱ्हाळ

नियमित प्रशिक्षणानंतर विमान धावपट्टीवर उतरवताना झालेल्या तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या काही तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकांना हे गतीअवरोध तंत्र वापरण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे विमानाला कोणतीही इजा झाली नाही. अरेस्टर बॅरिअर ही विमानाचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी नियोजितपणे वापरली जाणारी प्रणाली आहे. मात्र, या घटनेदरम्यान अचानक आलेल्या तांत्रिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तिचा वापर करण्यात आला. यावेळी काही वेळासाठी बंद ठेवण्यात आलेली धावपट्टी पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून घटनेच्या सखोल तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. हवाईदलाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर आशिष मोघे यांनी या घटनेबाबत माहिती दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 16:58 IST

संबंधित बातम्या