डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये टोकाचे चढ-उतार होत नाहीत. मात्र, इतर देशांची चलने डॉलरच्या तुलनेत खाली-वर होऊन सातत्याने घसरत आहेत. भारतीय रुपयाचे तसे होत नाहीये, ही दिलासा देणारी बाब आहे. त्यामुळे इतर चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची अवस्था चांगली असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी पुण्यात केला.

हेही वाचा >>> पप्पा आईला नका मारू असे म्हणणार्‍या आठ वर्षाच्या मुलीवर बापाने झाडली गोळी

शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली. या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया बऱ्यापैकी आहे. त्यात टोकाचे चढ-उतार होत नाहीत. यावर केंद्र सरकारचे बारीक लक्ष आहे. महागाईवर नियंत्रणासाठी केंद्राकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. खाद्य तेल आणि डाळींची उपलब्धता वाढविण्यासाठी आयात शुल्क हटवले आहे. त्यामुळे खाद्य तेल आणि डाळींचा पुरवठा वाढला आहे. परिणामी त्यांच्या किमती नियंत्रणात आल्या आहेत. सहकार क्षेत्रालाही करातून सवलत देऊन केंद्राने दिलासा दिला आहे.’