पिंपरी : महापालिकेच्या विविध विभागांतील ‘ब’ आणि ‘क’ गटातील १५ पदांच्या ३८८ जागांसाठी मे महिन्यात झालेल्या ऑनलाइन परीक्षेच्या निकालाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ११ पदांच्या ३५ जागांचा निकाल आठ दिवसांत आणि उर्वरित सर्व जागांचा निकाल १५ ऑगस्टपूर्वी जाहीर केला जाणार आहे.

महापालिकेच्या विविध विभागांतील ३८८ जागांसाठी मे महिन्यामध्ये तीन दिवस ऑनलाइन पद्धतीने राज्यातील विविध केंद्रांवर ५५ हजार ८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, पर्यवेक्षक, न्यायालयीन लिपीक, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता लिपिक या पदांसाठी टाटा कन्सलटन्सी सर्विसेसच्या (टीसीएस) माध्यमातून परीक्षा घेण्यात आली.

हेही वाचा – पवना धरण ९४ टक्के भरले; पण पिंपरी-चिंचवडसाठी दिवसाआडच पाणीपुरवठा

परीक्षेनंतर उमेदवारांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या. यामधील ११ पदांच्या ३५ जागांबाबत आलेल्या हरकतींचा निपटारा झाला आहे. त्यामुळे ४ हजार २३३ विद्यार्थ्यांचा येत्या आठ दिवसांत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपिक या चार पदांवरील हरकत घेण्याची मुदत संपली आहे. यामध्ये आलेल्या हरकतींवर टीसीएस कंपनीने निर्णय घेतला आहे. निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या चार पदांचा निकाल १५ ऑस्टपर्यंत लावण्यात येणार आहे.

हेही वाचा – राज्यातील १ कोटी ६९ लाख शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविम्याचे संरक्षण, सहा लाख कर्जदार शेतकऱ्यांची नोंदणी प्रलंबित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांच्या हरकतींचा निपटारा केला आहे. ११ पदांच्या ३५ जागांचा आठ दिवसांत आणि उर्वरित सर्व जागांचा निकाल १५ ऑगस्टपूर्वी जाहीर केला जाणार आहे. – विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका