सैनिकांसाठी काम करताना गरजा आणि हाव यातील फरक कळले. जात, धर्म,वंश, पंथ, भाषा यापलीकडे जाऊन काम करणारी एकमेव संस्था म्हणजे सैन्यदल. सैनिक ठरावीक वेळेत काम करत नाहीत, एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून संपावर जात नाहीत. स्वतः जगताना राष्ट्र प्रथम हा विचार घेऊन जगतात. म्हणूनच स्वतः पलीकडे जगण्याची प्रेरणा सैनिक देतात, असे मत सैनिकांसाठी काम करणाऱ्या ‘सिर्फ’ संस्थेच्या सुमेधा चिथडे यांनी व्यक्त केले.
हिंदू महिला सभेतर्फे क्रांती दिनानिमित्त सुमेधा चिथडे यांना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या हस्ते ‘साहस’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सियाचीन या जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमीवर आणि काश्मीरमधील कुपवाडामध्ये तैनात सैनिकांसाठी प्राणवायू प्रकल्पांची उभारणी आणि सैन्यदलांसाठी त्यांनी केलेल्या विविध कामांसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हिंदू महिला सभेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले यावेळी उपस्थित होत्या.

कीर्तनकार चारुदत्त आफळे म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर आजही आपल्याला अनेक सामाजिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पोलिस दलासाठी, रस्त्यावरील भीक मागणाऱ्या मुलांसाठी काम करणाऱ्या सुमेधा चिथडे यांच्यासारख्या अनेक रणरागिणींची गरज आहे. भविष्यातील संघर्षाचा सामना करण्यासाठी आपल्या मुलांमध्ये शौर्यवृती निर्माण केली पाहिजे, असेही आफळे यावेळी म्हणाले.

iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
sindhudurg district collector ordered deepak kesarkar s to deposit pistols
केसरकरांना पिस्तूल जमा करण्याचे आदेश, सावंतवाडीतील २५० परवानाधारकांपैकी केवळ १३ जणांना नोटीसा
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

सुप्रिया दामले म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या हिंदू महिला सभेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेचे यंदाचे ७२ वे वर्ष आहे. केवळ महिलांनी अतिशय यशस्वीपणे चालवलेली ही संस्था यापुढेही आपल्या कार्याचा वसा पुढे नेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलीनच्या संचालिका रमा चोभे आणि संस्थेच्या ३६ मुलांनी व्हायोलिन वादनातून देशभक्तीपर गीते सादर केली.