वेदान्त- फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यात राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज मावळमध्ये येणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मावळमध्ये जनआक्रोश आंदोलनात करण्यात येणार आहे. खोके सरकारने वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पाठविल्यामुळे, महाराष्ट्रातील युवा पिढीच्या झालेल्या नुकसानाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात असल्याचे युवासेनेने म्हटले आहे. मावळमध्ये वेदान्त- फॉक्सकॉन प्रकल्प होणार होता. त्यामुळं पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता. मात्र, हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे मावळमधील तरुणांचा रोजगार हिरवण्याचं काम शिंदे- फडणवीस सरकारने केला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. 

हेही वाचा- शाश्वत विकासाची उद्दिष्टे विकास प्रक्रियेच्या केंद्रस्थानी ठेवावीत – मुख्यमंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, वेदान्त- फॉक्सकॉन प्रकल्प शिंदे- फडणवीस सरकार ने गुजरात ला पळवल्याचा आरोप आदित्य यांनी केला होता. पोटोबा मंदिर ते पंचायत समिती कार्यालय पर्यंत मोर्चा काढला जाणार आहे. त्यानंतर त्यांची सभा होणार असून सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शिवसैनिकांमध्ये उत्साहाच वातावरण आहे. आज दुपारी चारच्या सुमारास आदित्य ठाकरे जनआक्रोश आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांनतर ते मावळकरांना संबोधित करतील. आंदोनलानादरम्यान आदित्य ठाकरे काय बोलणार? याकडे सध्या मावळकरांचं लक्ष लागलं आहे. या जनआक्रोश आंदोलनाकडे विरोधक कसं पाहतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे.