संजय जाधव

पुणे : बांधकाम उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या जेसीबी कंपनीने हायड्रोजन इंधनावर संशोधन सुरू केले आहे. भविष्यात हायड्रोजन इंधन हा सर्वांत महत्वाचा पर्याय ठरणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात कंपनीकडून हायड्रोजनवर चालणारी उपकरणे सादर केली जाणार आहेत.

याबाबत जेसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक दीपक शेट्टी म्हणाले की, पुण्यातील तळेगाव येथील प्रकल्पात आमच्या प्रत्येक उपकरणांची रचना केली जाते. या प्रकल्पात पर्यायी इंधनावरही काम सुरू आहे. पारंपरिक इंधनाला भविष्यात हायड्रोजन हा पर्याय असणार आहे. त्यामुळे आमच्याकडून त्यावर काम सुरू आहे. कंपनीने याआधी सीएनजी आणि इलेक्ट्रिक उपकरणे सादर केली आहेत. सध्या कंपनीकडून बांधकाम उपकरणांच्या १९ मॉडेलचे उत्पादन केले जाते.

आणखी वाचा-माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाष्य, म्हणाले, ‘लोकसभेत भाजप जिंकल्यास विधानसभा निवडणुका होणार नाहीत…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतात इलेक्ट्रिक उपकरणांसाठी पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची संख्या मर्यादित राहिली आहे. अनेक रस्त्यांचे प्रकल्प हे दुर्गम भागात सुरू असतात. त्या भागात रस्तेही पोहोचलेले नसल्यामुळे तिथे वीजही उपलब्ध नसते. त्यामुळे तिथे इलेक्ट्रिक उपकरणे वापरणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी पारंपरिक इंधनाशिवाय इतर पर्याय शिल्लक राहत नाहीत, असे शेट्टी यांनी नमूद केले.