कर्नाटकातला महाविद्यालयातील हिजाब बंदीचा वाद आता चांगलाच चिघळला आहे. या वादाचे पडसाद देशभरात उमटू लागले आहेत. कर्नाटकातल्या भाजपा सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मुस्लीम महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

कर्नाटकातल्या या हिजाब बंदीच्या प्रकाराविरोधात तसंच त्या राज्यातल्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महात्मा फुलेवाडा येथे निषेध आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन कऱण्यात आलं. यावेळी फुलेवाडा इथल्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या पुतळ्याच्या समोर असलेल्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आंदोलनासाठी मुस्लीम महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.